हरि ॐ
आपण जी काही भक्ती सेवा केली आहे त्या सेवेसाठी तुलसीपत्र मिळविण्यासाठी आपल्याला तशी रिक्वेस्ट करन्सी सिस्टीम कडे करावी लागेल.
करन्सी क्रेडीट क्लेम वर क्लिक केल्या नंतर खालील विंडो दिसेल. आपण ही स्क्रीन समजावून घेऊ. तुम्ही आत्ता पर्यंत एक ही करन्सी क्लेम केली नसल्याने तुम्हाला इथे "नो रेकॉर्ड फाऊंड" असा मेसेज येत आहे. त्यामुळे आपण आता आपला पहिला क्लेम सबमिट करूया. यासाठी वर्तूळात असलेल्या "अॅड न्यू क्लेम" च्या बटनावर क्लिक करा. (क्र - 5A1)
सिस्टीम मध्ये आधीच सेवांची यादी समाविष्ट केलेली आहे. त्या पैकी तुम्ही केलेली सेवा तुम्हाला निवडायची आहे.
- त्यासाठी "सिलेक्ट सेवा वर" (क्रं- 5A2), क्लिक करावे.
यानंतर तुम्हाला पुढील स्क्रीन दिसेल.
- त्या नंतर ह्या मुख्य प्रोजेक्ट मधील उप प्रोजेक्ट "सब प्रोजेक्ट" मधून निवडावा. उदा. तुम्ही क्राऊड मॅनेजमेंट हा प्रोजेक्ट निवडला.
- आता तुम्ही जी भक्ती सेवा केलीती "भक्ती सेवा टास्क" मधून निवडावी, उदा. तुम्ही एक्स्टर्नल इव्हेंट ही सेवा निवडली. आता या सेवेसाठी तुम्ही उपासना केंद्र देखील देऊ शकता. परंतु ते देणे बंधनकारक नाही. (क्र - 5A3)
- आता त्या सेवेची तारीख देणे तुम्हाला बंधनकारक आहे. कारण त्याशिवाय ती सेवा सर्च होऊ शकत नाही.
सर्च करण्यासाठी 1 आकड्याच्या वर्तूळातील "सर्च"चे बटन दाबा.
तुम्ही भरलेली माहीती अगदी बरोबर असेल तर तुम्ही शोधत असलेली भक्ती सेवा टास्क तुम्हाला दिसेल. (क्र - 5A4)
तुमच्या भक्ती सेवा टास्कवर सिंगल क्लिक करुन 2 क्रमांकाच्या वर्तूळातील "फ़ाईल करन्सी क्लेम" या बटनावर क्लिक करावे.
त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन स्क्रिन उघडेल.
ज्या मध्ये तुम्ही या आधी भरलेली सर्व माहिती दिसेल. आणि त्याखाली "परफॉर्मन्स मेजर" (क्रं- 5A5), हा पर्याय दिसेल.
या परफॉर्मन्स मेजर कॉलम मध्ये तुमच्या भक्ती सेवेचे डीटेल्स भरायचे.
हे डीटेल्स अंकस्वरुपातच असतील हे लक्षात ठेवावे.
उदा.तुम्ही १० लड्या सबमिट केल्या तर १० आकडा लिहावा तसे इथे लिहावे किंवा तुम्ही एक दिवसाची सेवा केली की १ असा आकडा भरावा. तुमच्या सेवेच्या मोजमाप चे जे प्रमाण आहे ते कंसात दिसेल. (म्हणजे Quantity, Days, Hours, etc)
त्यानंतर हा क्लेम सबमिट करताना जर काही कमेंट द्यायची असेल तर ती आपण देऊ शकतो. (क्र - 5A6) ही कमेंट अगदी थोडक्यात असावी. कमेंट देणे बंधनकारक नाही. त्यानंतर, वर्तुळातील सबमिट क्लेमच्या बटनावर क्लिक करावे.
तुमचा क्लेम सबमीट झाल्याचा मेसेज देणारी "इन्फॉर्मेशन" नावाची विंडो तुम्हाला दिसू लागेल.
आता क्लोज बटनावर क्लिक करुन तुम्ही पुन्हा "माय रिक्वेस्टेड क्लेम" पेज वर याल. तिथे (क्र - 5A7) टेबल मध्ये तुम्ही केलेले नवीन क्लेम दिसू लागतील.
या टेबल मधील महत्त्वाच्या गोष्टी पुढील प्रमाणे,
भक्ती सेवा टास्क - तुम्ही ज्या कोण त्या भक्ती सेवेसाठी तुलसीपत्र मिळण्याबाबत रिक्वेस्ट केली आहे त्या भक्ती सेवेचे नाव या कॉलममध्ये दिसेल.
उपासना केंद्र - तुम्ही ही सेवा ज्या उपासना केंद्राशी निगडीत आहे, किंवा जे उपासना केंद्र तुम्ही तुलसीपत्र रिक्वेस्ट करताना भरलेले आहे. त्या उपासना केंद्राचे नाव इथे दिसेल.
मेजरमेंट - भक्ती-सेवा किती केली गेली आहे, किती तास केली गेली आहे याची माहीती या कॉलम मध्ये दिसेल. उदा.1. जर तुम्ही 2 लड्या बनविल्या आहे. 2 No. of Hanks असा आकडा या कॉलममध्ये दिसेल.
2. जर एक दिवसाची सेवा केली आहे तर 1.0 days असे दिसेल.
भक्ती-सेवाडेट - ज्या तारखेला तुम्ही भक्ती-सेवा केली आहे ती तारीख या कॉलममध्ये दिसते.
रिक्वेस्ट डेट - ज्या तारखेला तुम्ही करन्सी क्लेम करता ती तारीख इथे दिसते.
स्टेटस - इथे तुमच्या क्लेमचा रिसेन्ट स्टेटस दिसतो.
"क्लेम स्टेटस"
टेबलच्या वर ती उजव्या बाजूच्या कोपर्यामत "क्लेम स्टेटस" (Claim Status) (क्रं- 5A8), हा पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला सहा उप पर्याय आहेत. ते पुढील प्रमाणे
क्लेम्ड - या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही ज्या क्लेम रिक्वेस्ट पाठविल्या आहेत त्या रिक्वेस्टस दिसतात.
क्लेम रिजेक्टेड - तुमचा क्लेम जर रिजेक्ट झाला असेल तर या पर्यायावर क्लिक केल्यावर टेबल मध्ये दिसेल. ज्या वेळी रेकमेंडर कडून क्लेम रिजेक्ट केला जतो त्यावेळी तो क्लेम रिजेक्टेड या स्टेटस च्या इथे दिसतो. हे लेवल १ रिजेक्शन आहे.
रेकमेंडेड - तुमचा क्लेम पहिल्या लेव्हलवर कॉर्डीनेटरने म्हणजेच क्लेम रेकमेंडरने रेकमेंड केल्या नंतर या पर्यायावर क्लिक केल्यावर टेबलमध्ये दिसेल.
अप्रुव्ह्ड - तुमचा क्लेम दुसर्या लेव्हलवर सेवेसाठी असणार्या क्लेम अप्रुव्हरने अप्रुव्ह केल्या नंतर या पर्याया वर क्लिक केल्यावर टेबलमध्ये दिसेल.
रिजेक्टेड - तुमचा क्लेम जर रिजेक्ट झाला असेल तर या पर्यायावर क्लिक केल्यावर टेबलमध्ये दिसेल. क्लेम अप्रुव्हर जेव्हा क्लेम रिजेक्ट करतो तेव्हा तो क्लेम ह्या स्टेटसला दिसतो. हे लेवल २ रिजेक्शन आहे.
कॅन्सल्ड - तुमचा क्लेम कायम स्वरुपी कॅन्सल झाला असेल तर या पर्यायावर क्लिक केल्यावर टेबलमध्ये दिसेल.
आता या क्लेम चे डिटेल्स तुम्हाला पाहायचे असल्यास त्या ओळीवर सिंगल क्लिक करा.
त्या नंतर टेबलखाली तुम्हाला दोन बटन दिसतील. त्यातील (क्र- 5A9) "व्ह्यू सबमिट क्लेमच्या" बटन वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या क्लेमची सगळी माहीती मिळेल.
तसेच "एडीट अॅण्ड रिसबमिट" (क्र-5A10) बटन वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा क्लेम एडिट करता येईल. म्हणजे त्यात सुधारीत माहिती भरता येईल.
लॉगआऊट
तुमचे चण्डिका स्पिरॅच्युअल करन्सी वेबसाईट वरील काम झाल्यावर उजवीकडे असलेल्या "लॉगआऊट" (क्रं-3) च्या बटनावर क्लिक करावे.
॥ हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥