Saturday, 6 September 2014

चण्डिका स्पिरिच्युअल करन्सी सिस्टीम - स्वतःचे करन्सी अकाऊंट पाहणे

हरि ॐ

तुम्हाला तुमची किती तुलसीपत्रे जमा झाली आहेत हे पहायचे असल्यास "करन्सी व्ह्यू" (क्र- 6) हा पर्याय निवडा. या पर्यायातील माय करन्सी अकाऊंटच्या (क्र – 6A) ऑप्शनवर क्लिक करा. आता तुम्हाला पुढची विंडो दिसेल.

कोणत्याही इतर बॅंकेच्या ऑनलाईन अकाऊंट स्टेटमेंट प्रमाणेच मदर चण्डिका स्पिरीच्यूअल करन्सीचे अकाऊंट स्टेटमेंट आहे. इथे सुरुवातीला (क्र – 6A1) तुमच्या अकाऊंटचे डिटेल्स दिसतील. नाव, ईमेल, एकूण तुलसीपत्रे आणि अकाऊंट सुरु करण्याची तारीख. त्यानंतर तुमचे अकाऊंट स्टेटमेंट हे दोन पद्धतीने पाहता येईल. त्यातील पहिले म्हणजे मिनि स्टेटमेंट. यासाठी मिनि स्टेटमेंट (क्र – 6A2)  सिलेक्ट करा.
हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला खाली माय ट्रान्झॅक्शनस दिसू लागेल. ज्यामध्ये  ट्रॅन्झॅक्शनची तारीख,  ट्रॅन्झॅक्शन डिटेल (भक्तीसेवा टास्क, सिस्टीम A, ट्रान्सफर इत्यादी) ,  ट्रॅन्झॅक्शन टाईप (क्रेडीट किंवा डेबिट) ,  जमा किंवा वजा तुलसीपत्रांची संख्या आणि शेवटी रनिंग बॅलेंस दिसेल. 
सगळ्यात रिसेंट ट्रॅन्झॅक्शन सर्वात वरच्या ओळीत दिसेल. एखादे ट्रॅन्झॅक्शन डिटेलमध्ये पाहण्यासाठी ट्रॅन्झॅक्शन डिटेलस मध्ये असणार्‍या लिन्क वर क्लिक करा. 
त्यानंतर तुम्ही पिरीऑडीक स्टेटमेंट देखील निवडू शकता. यासाठी (क्र – 6A3) पिरिऑडीक स्टेटमेंट पर्याय निवडा. त्याच्या बाजूला (क्र-6A4) तुम्ही कालावधी निवडून पिरिऑडीक स्टेटमेंट पाहू शकता. 

खालील माय ट्रॅन्झॅक्शनमध्ये निवडलेल्या कालावधीतील स्टेटमेंट दिसत आहे.
॥ हरि ॐ ॥  ॥ श्री राम ॥  ॥ अंबज्ञ ॥

Powered by Blogger.