Friday, 12 September 2014

चण्डिका स्पिरिच्युअल करन्सी सिस्टीम - करन्सी क्लेम अप्रुव्ह करणे

  हरि ॐ

कोर्डिनेटरने रेकमेंड केल्यानंतर श्रद्धावान युजरचा करन्सी क्लेम हा अंतिम अप्रुव्हलसाठी सेवा क्लेम अप्रुव्हर कडे येतो. सेवा क्रिएट करणारा श्रद्धावानच क्लेम रेकमेंडर  आणि  सेवा क्लेम अप्रुव्हर ची निवड करतो. सेवा क्रिएशन च्या हेल्प मॅन्युअल मध्ये या संबंधी अधिक माहिती दिलेली आहे.

तुम्हाला जर सेवा अप्रुव्हरची थॉरिटी असेल तर तुम्हाला "वर्क फ्लो" (Work Flow) (क्र - 7)मध्ये "अप्रुव्ह करन्सी क्लेम" (Approve Currency Claim) (क्र - 7D) हा पर्याय दिसेल
त्यावर क्लिक केल्यावर करन्सी क्लेमचे पेज दिसेल.
  
 ज्या सेवेचे तुम्ही क्लेम अप्रुव्हर आहात, त्या सेवेच्या क्लेम को ऑर्डीनेटरने रेकमेंड केलेल्या क्लेम्स्‌ची यादी (क्र - 7D1) दिसेल. श्रद्धावानाचा क्लेम अप्रुव्ह करण्यासाठी त्याच्या नावासमोरील चेकबॉक्स वर टीक करुन सिलेक्ट करावे. मग यादी खाली येणार्याच "अप्रुव्ह/रिजेक्ट करन्सी क्लेम" “Approve/Reject Currency Claim” (क्र - 7D2)  बटनावर क्लिक करावे.यानंतर पुढील स्क्रीन ओपन होईल.

 येथून तुम्ही क्लेम अप्रुव्ह किंवा रिजेक्ट करू शकता. अप्रुव्ह करण्यासाठी "Approve" (क्र - 7D3) या बटनावर क्लिक करा. रिजेक्ट करण्यासाठी "Reject Recommended Claim" (क्र - 7D4) या बटनावर क्लिक करा. तुम्हाला काही टिप्पणी द्यायची असल्यास वरील कमेंट बॉक्सचा वापर करता येईल. 
नंतर इन्फॉर्मेशन विंडो येईल. त्यात तुम्ही क्लेम यशस्वीपणे अप्रुव्ह केला असल्याचा मेसेज येईल. 

क्लोजवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पुन्हा करन्सी क्लेमच्या विंडोवर याल. तुम्ही सगळे क्लेम अप्रुव्ह केल्यानंतर 'रेकमेंडेड क्लेम स्टेटस' अंतर्गत तुम्हाला यादी दिसणार नाही. तुम्ही अप्रुव्ह केलेले क्लेम्स "अप्रुव्हड" या पर्यायांतर्गत दिसतील. यासाठी क्लेम स्टेटसमध्ये "अप्रुव्हड" “Approved” (क्र-7D5) हा पर्याय निवडावा.

॥ हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥

Powered by Blogger.