Friday, 12 September 2014

चण्डिका स्पिरिच्युअल करन्सी सिस्टीम - सेवा रिक्वेस्ट अप्रुव्ह करणे

हरि ॐ

सेवा अप्रुव्ह करण्याची ऑथोरिटी ज्याच्याकडे असेल त्यांनाच हा "वर्क फ्लो" (Work Flow) (क्र - 7) मधील सेवा अप्रुव्हचा (Seva Approve) (क्र -7B) ऑप्शन दिसेल. सेवा अप्रुव्ह करण्याची ऑथोरिटी संस्थेच्या सीईओंकडे असणार आहे.या ऑप्शनवर (क्र – 7B) क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील भक्ती सेवा रिक्वेस्टची स्क्रिन दिसेल. 

यामध्ये (क्र – 7B1) दिसणार्याो यादीत सर्वप्रथम रेकमेंड होऊन आलेल्या सेवांची यादी दिसेल. 

सेवा अप्रुव्ह करण्यासाठी अप्रुव्ह स्टेटस मेनूवर रेकमेंडेड (Recommended) हा पर्याय निवडलेला असल्याने तुम्हाला ही यादी दिसते एखाद्या उपासना केंद्राच्या रेकमेंडेड सेवा पहाण्यासाठी मेन प्रोजेक्ट फ़िल्टर चा उपयोग करावा 

 या यादीतील जी सेवा अप्रुव्ह करावयाची आहे. ती सिंगल क्लिक करुन सिलेक्ट करावी (क्र – 7B3) .

त्यानंतर वर्तूळातील "अप्रुव्ह रिक्वेस्ट" च्या(Approve Request) बटनावर क्लिक करावे. तुम्हाला येथून सेवा रिजेक्ट अथवा कॅन्सल्ड देखील करता येते. 
त्यानंतर तुम्हाला पुढील विंडो दिसेल.

येथे वर्तूळ केलेल्या बटनावर क्लिक करुन रिक्वेस्ट अप्रुव्ह करावी. रिक्वेस्ट अप्रुव्ह करताना जर तुम्हाला काही टीप्पणी द्यावयाची असेल तर कमेंट बॉक्समध्ये (क्र – 7B4) देता येईल. तुम्ही सेवा यशस्वीपणे अप्रुव्ह केली आहे हे सांगणारी इन्फॉर्मेशन विंडो नंतर उघडेल.

अप्रुव्ह केलेल्या सेवेचे डिटेल्स पाहायचे असल्यास, अप्रुव्ह्ड सेवा स्टेटस क्लिक केल्यावर समोर दिसत असलेल्या सेवेवर सिंगल क्लिक केल्यावर व्ह्यु डिटेल्स हे ऑपशन दिसेल. 
व्हू डिटेल्स - ह्या ऑपशनला क्लिक केल्यावर तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. उदा. सेवेचे स्वरुप, कॉर्डीनेटर, क्लेम अप्रुव्हर, इत्यादी सर्व माहिती दिसेल. 


एडिट अप्रुव्ह्ड भक्ति सेवा टास्क – ह्या ऑपशनचा उपयोग करून आपण आधीच अप्रुव्ह्ड असलेल्या सेवेमध्ये आणखी क्लेम को ऑर्डीनेटर्स आणि क्लेम अप्रुव्हर्स ऍड करू शकतो. तसेच जर एखाद्या अप्रुव्हड सेवेला कोणीही क्लेम केले नसेल तर ती अप्रुव्हड सेवा रिजेक्ट सुद्धा करता येते.

॥ हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥



Powered by Blogger.