Sunday, 12 October 2014

हरीॐ
चण्डिका स्पिरिच्युअल करन्सीमध्ये आपले स्वागत आहे.


सर्व प्रथम आपल्या ब्राऊजरच्या ऍड्रेसबार मध्ये चण्डिका स्पिरॅच्युअल करन्सीची www.chandikaspiritualcurrency.com युआरएल (साईटचा पत्ता) टाईप करावी. तुमच्या समोर पुढील होम पेज दिसेल. रजिस्टर करण्यासाठी जॉईनच्या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल.

हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर  आपण ज्या ई-मेलने रजिस्टर केले आहे; त्या ई-मेलवर तुम्हाला चण्डिका स्पिरिच्युअल करन्सी कडून मेल येईल.  त्यात तुमचा पासवर्ड असेल.  ह्या पासवर्डचा वापर करुन तुम्ही चण्डिका करन्सीला लॉगइन करू शकता. पहिल्यांदा लॉगइन केल्यावर तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकता.  
चण्डिका करन्सी सिस्टीमचा लाभ घेण्यासाठी हा रजिस्ट्रेशनफॉर्म भरणे अनिवार्य आहे. 
लॉगइन

आता होमपेज साठी लॉगइन च्या बटनवर क्लिक करा. एक नवी पॉपअप विंडो उघडेल. त्यात 1 आकडा लिहला आहे तिथे तुमचा ईमेल व 2 आकडा लिहला आहे तिथे तुमचा पासवर्ड भरावा आणि मग बाण दाखविलेल्या लॉगइनच्या बटनावर क्लिक करावे.
लॉगइन केल्यावर खालील स्क्रीन तुम्हाला दिसते. या स्क्रिनवर उजवीकडे मायप्रोफाईल (क्रं-१), चेंजपासवर्ड (क्रं- २), लॉगआऊट (क्रं- ३) आणि हेल्पचे (क्रं- ४) बटन आहे.

तुमची स्वतःची प्रोफाईल पाहण्यासाठी माय प्रोफाईलवर  (क्रं-१),  क्लिक करावे. इथे तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये भरलेली माहिती पाहता येईल. इथून तुम्हाला तुमची माहिती एडिटही करता येईल. त्यासाठी एडिट प्रोफ़ाईलच्या बटनावर क्लिक करावे. इतर माहिती सोबत आता आपण आपला इमेल आयडी देखील बदलू शकतो.

चेंज पासर्वड
चण्डिका करन्सीने दिलेला पासवर्ड बदलण्यासाठी "चेंजपासर्वड" (क्रं- २) वर क्लिक करा. 
(टीप: तुमच्या अकाऊंटच्या सुरक्षितेसाठी तुमचा अकाऊंट पासवर्ड हा कुणाशीही शेअर करु नये. (क्र - ५ (रिक्वेस्ट), ६ (करन्सी व्ह्यू), व ७ (वर्कफ्लो) बद्द्लची माहीती पुढे वेगळी देण्यात आलेली आहे.)

फ़रगॉट पासवर्ड
जर तुम्ही तुमचा चंडिका करन्सी अकाउंटचा पासवर्ड विसरला असाल तर लॉगइन बटनवर क्लिक करून फ़रगॉट पासवर्ड ऑपशन वर क्लिक करावे. 

आपला इमेल आयडी टाईप करून डेट ऑफ़ बर्थ लिहिलेल्या कॉलममध्ये आपली जन्म तारिख टाईप करावी. सबमीट ऑपशन क्लिक करावे. 

आपल्या इमेल आयडीच्या इनबॉक्स मध्ये लगेचच आपला नवीन पासवर्ड पाठवला जातो. तो वापरून  तुम्ही अकाउंटला लॉगइन करू शकता. 

हेल्प मेन्यु
जर तुम्हाला चंडिका करन्सी बद्दल कुठलीही अडचण असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही हेल्प मेन्यु क्लिक करून अधिक माहिती मिळवू शकता. 

चण्डिका स्पिरिच्युअल करन्सीमध्ये आपल्याला जी करन्सी मिळणार आहे त्याचे डिनॊमिनेशन्स देखील हेल्प मेन्यु मध्ये तुम्ही पाहू शकता. 
चण्डिका स्पिरिच्युअल करन्सी मधील नवीन नोटिफ़िकेशन्स पाहण्यासाठी हेल्प मेन्यु मध्ये जावे.
लॉगआऊट
चंडिका करन्सी अकाउंटवर आपले सर्व काम पूर्ण झाल्यावर कृपया लॉगआऊट बटन क्लिक करून एक्झिट करणे.
॥हरिॐ॥॥श्रीराम॥॥अंबज्ञ॥

Friday, 12 September 2014

हरि ॐ
उपासना केंद्र प्रमुख सेवक, उप-प्रमुख सेवक व संस्थेच्या विविध कमिटीचे मेंबर्स हेच फ़क्त सेवा क्रिएट करू शकतात.
सेवा क्रिएट करण्यासाठी खालील स्क्रीनच्या डावीकडील (क्र- 5) “रिक्वेस्टवर” क्लिक करा तिथे (क्र- 5B) असलेल्या "न्यूसेवा" "New Seva" वर क्लिक करा.

न्यू सेवावर क्लिक केल्यावर तुम्हाला खालील "भक्ती सेवा रिक्वेस्ट" ची (क्रं- 5B1) स्क्रीन दिसेल.

येथे तुम्ही वर्तुळात असलेल्या "Add New Request" वर क्लिक करा. 
त्यानंतर तुम्हाला पुढील स्क्रिन दिसेल. 

तुम्हाला ज्या सेवेची रिक्वेस्ट करायची आहे ती सेवा मेन प्रोजेक्ट Main Project, सबप्रोजेक्ट Sub Project आणि भक्ती सेवा टास्क Bhakti Seva Task मधून निवडावी. 
- त्यानंतर ही सेवा ज्या उपासना केंद्रामध्ये होणार आहे ते केंद्र निवडावे.
- ही सेवा रिक्वेस्ट केंद्राकडून आहे की पुरुषार्थ मंडलम कलश कडून आहे हे ठरविण्यासाठी "इनिशिएटेडबाय" "Initiated By" ह्या पर्यायतून निवड करावी.
- सेवा जिथे होणार त्या स्थळाचा पत्ता देणे आवश्यक आहे.
- त्या नंतर  या भक्ती सेवेचा कालावधी भरणे आवश्यक आहे. भक्ती सेवा कोणत्या तारखेला सुरु होते आणि कोणत्या तारखेला संपते हे देणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यानंतर या सेवेचे कॉर्डीनेटर म्हणजेच क्लेम रेकमेंडर व सेवा क्लेम अप्रुव्हर कोण आहेत याची निवड आपल्याला करायची आहे.
यासाठी "ऍड कॉर्डीनेटर" (क्रं- 5B2) वर क्लिक करा.
तुम्ही एका पेक्षा जास्त क्लेम  रेकमेंडर्स (को-ऑरडिनेटर्स) आणि क्लेम अप्रुव्हर्सची नियुक्ति करू शकता.
शेवटी असलेली लिंक सेवेची संपूर्ण माहिती भरून क्लिक केल्यावर आपल्याला त्या  सेवेला किती तुलसीपत्र आहेत हे दिसेल. ‘click here to view tulsipatra allocations’ या लिंकवर क्लिक करून आपण त्यासेवेसाठी असणारी तुलसीपत्र ऍलोकेशन्स बघू शकतो.
"अॅड कॉर्डीनेटर" "Add Coordinator” 
आता आधी तुम्हाला युजर सर्च करायचा आहे.
जो या चण्डिका करन्सी सिस्टीमचा युजर आहे त्यालाच तुम्ही कॉर्डीनेटरम्हणून निवडू शकता.
ज्या श्रद्धावानाला तुम्हाला कॉर्डीनेटरकरायचे आहे, त्यास तुम्ही नाव, आडनाव, उपासना केंद्र, ई-मेल व त्या श्रद्धवानाचे पद म्हणजेच युजर टाईप या पर्यायांनी शोधू शकता. (क्रं-5B3)

उदा. इथे नंदन भालवणकर या श्रद्धावानासाठी त्यांच्या नाव आणि आडनावाने सर्चदिले आहे. 
आवश्यक त्या जागा भरल्यानंतर वर्तुळ 1 मधील सर्चचे बटन दाबा.
मग त्या नावाचा सर्च होऊन ती यादी तुम्हाला खाली दिसेल. या यादीत सगळ्यात पहिल्या कॉलममधील चेक बॉक्सवर क्लिक करुन तुम्ही श्रद्धावानाची निवड कॉर्डीनेटर म्हणून करु शकता. या यादीत (क्रं-5B4) तुम्हाला पहिले नाव, दुसरे नाव व ई मेल दिसेल. 
सगळ्यात शेवटी वर्तुळ 2 मधील ’अॅदड कॉर्डीनेटर’चे बटन दाबा. यानंतर पुन्हा तुम्ही या आधीच्या विंडोवर याल.
तिथे आता नंदन भालवणकर यांची नोंद सेवा क्लेम रेकमेंडर म्हणजेच कॉर्डीनेटर म्हणून झालेली तुम्हाला दिसू लागेल. तुम्ही एका पेक्षा अधिक कॉर्डीनेटर देखील निवडू शकता. 
तसेच निवडलेला कॉर्डीनेटर रिमुव्ह करण्याचाही पर्याय तुम्हाला दिलेला आहे. (क्रं-5B5)

 नंतर सेवा क्लेम अ‍प्रुव्हर्सची निवड करावयची आहे. सेवा क्लेम रेकमेंडर म्हणजेच कॉर्डीनेटरने रेकमेंड केलेला तुलसीपत्र क्लेम अंतिम अप्रुव्हलसाठी सेवा क्लेम अप्रुव्हरकडे येणार आहे.
ज्याप्रमाणे कॉर्डीनेटर्सची निवड केली त्याच प्रमाणे आपण सेवा क्लेम अ‍प्रुव्हरची देखील निवड करायची आहे.

या विंडो मध्ये निखिल भालवणकर यांस सेवा क्लेम अ‍प्रुव्हर म्हणून निवडण्यात आले असल्याचे दिसत आहे
आता पुन्हा शेड्युल न्यू भक्ती सेवा प्रोग्रॅमची स्क्रीन दिसेल. तिथे आता तुम्हाला सेवा अ‍प्रुव्हर म्हणून निखिल भालवणकर यांचे नाव निवडलेले दिसत आहे.

सबमिट बटन वर क्लिक केल्यावर तुमची सेवा भक्ती रिक्वेस्ट ही अॅमप्रुव्हलसाठी पाठविण्यात आली आहे असा मेसेज तुम्हाला मिळेल.तुम्ही परत भक्ती सेवा रिक्वेस्टच्या मुख्य पेजवर याल. (क्रं - 5B1)

 तिथल्या टेबलमध्ये तुमची नवीन सेवा रिक्वेस्ट दिसेल आणि तिचे स्टेटस पेंडींग असेही दिसेल.
आणि ज्यावेळी आपण सेवा रेकमेंड करू त्यावेळी तिचे बदललेले स्टेटस म्हणजेच रेकमेंडेड स्टेटस आपण पाहू शकतो.
ज्यावेळी सेवा अप्रुव्ह होते तेव्हा तीचे अप्रुव्हड हे स्टेटस आपल्याला दिसते.
तसेच जर चुकिची सेवा रिक्वेस्ट पाठवली गेली तर ती सीईओज कडून रिजेक्ट केली जाते ती आपल्याला रिजेक्टेड स्टेटसच्या अंडर दिसते. आणि कायमची कॅन्सल्ड रिक्वेस्ट कॅन्सल्ड ह्या स्टेटसच्या अंडर दिसते.

॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥





हरि ॐ

सेवा रिक्वेस्ट केल्यानंतर ती पहिल्या लेव्हलच्या अप्रुव्हलसाठी सेवा रेकमेंडरकडे येते. जर तुम्हाला सेवा रेकमेंडेशन करण्याची अथॉरिटी असेल तरच तुम्हाला "वर्क फ्लो" (Work Flow) (क्रं-7) हे ऑप्शन आणि त्यातील "रेकमेंड सेवा रिक्वेस्ट" (Recommend Seva Request) (क्रं-7A) हे ऑप्शन दिसेल.

उदा. एखाद्या केंद्राच्या प्रमुख सेवकाने सेवा रिक्वेस्ट केल्यावर त्याच केंद्राचा दुसरा प्रमुख सेवक ती सेवा रेकमेंड करु शकेल. त्यास याची अथॉरिटी असणार आहे. 
"रेकमेंड सेवा रिक्वेस्ट"वर (Recommend Seva Request) (क्रं-7A) क्लिक केल्यावर तुम्हाला पुढील स्क्रिन दिसेल.


या मध्ये तुम्हाला उपासना केंद्र, सेवा स्टेटस आणि मेन प्रोजेक्ट हे तीन फिल्टर सेवा शोधण्यासाठी दिलेले आहेत.
१) प्रमुख सेवकांसाठी – केंद्रा तील सेवा रेकमेंड करण्यासाठी आधी केंद्राचे नाव सिलेक्ट केल्यावर तुमच्या केंद्रातील प्रमुख सेवकांनी क्रिएट केलेल्या सेवा दिसतील. ही लिस्ट मेन प्रोजेक्ट नुसार फ़िल्टर करून तुम्ही पाहू शकता.


२) इतर कमिटी मेंबर्स साठी – मेन प्रोजेक्टमध्ये आपल्या प्रोजेक्ट (सेवेचे) चे नाव सिलेक्ट करून सर्च केल्यावर विविध केंद्रांनी क्रिएट केलेल्या सेवा दिसतील. उदा. इको फ़्रेंडली गणेश मूर्ति कमिटीच्या मेंबर्सने ‘eco friendly ganesh moorti’ असे मेन प्रोजेक्ट मध्ये सिलेक्ट केल्यावर त्यांना ज्या केंद्रांनी सेवा क्रिएट केली असेल त्यांची लिस्ट समोर दिसेल आणि मग त्या सेवा कमिटी मेंबर्स रेकमेंड करू शकतील.
जी सेवा रेकमेंड करायची आहे. ती सेवा सिंगल क्लिकने सिलेक्ट करुन वर्तूळात दिलेल्या "रेकमेंड रिक्वेस्ट" (Recommend Request) (क्र-7A3) वर क्लिक करावे. त्यानंतर पुढील विंडो दिसेल.

तुम्हाला ही सेवा वर्तूळात असलेल्या "रेकमेंड रिक्वेस्ट" (Recommend Request) या बटनावर क्लिक करुन रेकमेंड करता येईल.सेवा रेकमेंड करताना जर तुम्हाला काही टीप्पणी करावयाची असेल तर कमेंट बॉक्समध्ये (Comment) (क्र – 7A4) तुम्ही करु शकता 

काही सेवा करण्याआधी उपासना केंद्रांना CCCC कडून पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. अशा सेवा उपासना केंद्रावर करून झाल्यावर चंडिका करन्सी साईटवर त्या सेवा क्रिएट करून रेकमेंड करताना कमेंट बॉक्समध्ये CCCC कडून आलेल्या परवानगीच्या मेलचा रेफ़रन्स देणे आवश्यक आहे.
सेवा रेकमेंड केल्यानंतर तुम्हाला पुढील विंडो दिसेल.

तुमचे सेवा रेकमेंडेशन स्वीकारण्यात आले असून ते लेव्हल २च्या अंतिम अप्रुव्हलसाठी पुढे पाठविण्यात येत आहे. असा मेसेज या इन्फॉर्मेशन(Information) विंडोमध्ये दिसेल.
क्लोजवर (Close) क्लिक केल्यावर तुम्ही पुन्हा भक्ती सेवा रिक्वेस्ट रेकमेंडेशन पेजवर याल. रेकमेंडेड स्टेटस निवडून इथे तुम्हाला तुम्ही रेकमेंड केलेल्या सेवांची यादी दिसेल.
(क्र-7A5) दिसेल.

या यादीच्या उजव्या कोपर्यासत "अप्रुव्हल स्टेटस" (Approval Status) चा एक मेनू दिसेल. (क्र-7A6)  यात पेंडींग (Pending), रेकमेंडेड (Recommended), अप्रुव्हड (Approved), रिजेक्टेड (Rejected)व कॅन्सल्ड (cancelled) हे पर्याय आहेत.  प्रत्येक सेवा कोणत्या स्टेटसमध्ये आहे हे तुम्ही या पर्यायांच्या सहाय्याने तपासू शकता. 
या यादीतील एखादी सेवा सिलेक्ट केल्यावर रेकमेंड रिक्वेस्ट बरोबरच तुम्हाला आणखीन चार पर्याय दिसतात.  ते पुढील प्रमाणे
१ व्ह्यू डिटेल्स (View Details)– यात तुम्ही सिलेक्ट केलेल्या सेवेची माहिती डीटेलमध्ये पाहू शकता.
एडिट रिक्वेस्ट (Edit Request) यात तुम्ही ही रिक्वेस्ट एडिट करु शकता. सेवा अप्रुव्ह होण्यापूर्वी जर त्यात काही बदल करायचे असल्यास सेवा रेकमेंडर एडिट हे ऑपशन वापरून योग्य ते बदल करून सेवा रेकमेंड करू शकतात. तसेच काही कारणास्तव सेवा रिजेक्ट झाल्यास एडिट हे ऑपशन वापरून आपण सेवा रिसबमिट करू शकतो.
३ रिजेक्ट रिक्वेस्ट (Reject Request)– यात तुम्ही ही रिक्वेस्ट रिजेक्ट करु शकता. जेणेकरुन सेवा रिक्वेस्ट करणार्‍या(ला यात अपेक्षित बदल करुन पुन्हा रिक्वेस्ट पाठविण्याचा संदेश देऊ शकता.
४ कॅन्सल रिक्वेस्ट (Cancel Request)– ही सेवा रिक्वेस्ट तुम्हाला रद्दच करयाची असेल तर या पर्यायाचा वापर करू शकता.  
॥ हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥


हरि ॐ

सेवा अप्रुव्ह करण्याची ऑथोरिटी ज्याच्याकडे असेल त्यांनाच हा "वर्क फ्लो" (Work Flow) (क्र - 7) मधील सेवा अप्रुव्हचा (Seva Approve) (क्र -7B) ऑप्शन दिसेल. सेवा अप्रुव्ह करण्याची ऑथोरिटी संस्थेच्या सीईओंकडे असणार आहे.या ऑप्शनवर (क्र – 7B) क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील भक्ती सेवा रिक्वेस्टची स्क्रिन दिसेल. 

यामध्ये (क्र – 7B1) दिसणार्याो यादीत सर्वप्रथम रेकमेंड होऊन आलेल्या सेवांची यादी दिसेल. 

सेवा अप्रुव्ह करण्यासाठी अप्रुव्ह स्टेटस मेनूवर रेकमेंडेड (Recommended) हा पर्याय निवडलेला असल्याने तुम्हाला ही यादी दिसते एखाद्या उपासना केंद्राच्या रेकमेंडेड सेवा पहाण्यासाठी मेन प्रोजेक्ट फ़िल्टर चा उपयोग करावा 

 या यादीतील जी सेवा अप्रुव्ह करावयाची आहे. ती सिंगल क्लिक करुन सिलेक्ट करावी (क्र – 7B3) .

त्यानंतर वर्तूळातील "अप्रुव्ह रिक्वेस्ट" च्या(Approve Request) बटनावर क्लिक करावे. तुम्हाला येथून सेवा रिजेक्ट अथवा कॅन्सल्ड देखील करता येते. 
त्यानंतर तुम्हाला पुढील विंडो दिसेल.

येथे वर्तूळ केलेल्या बटनावर क्लिक करुन रिक्वेस्ट अप्रुव्ह करावी. रिक्वेस्ट अप्रुव्ह करताना जर तुम्हाला काही टीप्पणी द्यावयाची असेल तर कमेंट बॉक्समध्ये (क्र – 7B4) देता येईल. तुम्ही सेवा यशस्वीपणे अप्रुव्ह केली आहे हे सांगणारी इन्फॉर्मेशन विंडो नंतर उघडेल.

अप्रुव्ह केलेल्या सेवेचे डिटेल्स पाहायचे असल्यास, अप्रुव्ह्ड सेवा स्टेटस क्लिक केल्यावर समोर दिसत असलेल्या सेवेवर सिंगल क्लिक केल्यावर व्ह्यु डिटेल्स हे ऑपशन दिसेल. 
व्हू डिटेल्स - ह्या ऑपशनला क्लिक केल्यावर तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. उदा. सेवेचे स्वरुप, कॉर्डीनेटर, क्लेम अप्रुव्हर, इत्यादी सर्व माहिती दिसेल. 


एडिट अप्रुव्ह्ड भक्ति सेवा टास्क – ह्या ऑपशनचा उपयोग करून आपण आधीच अप्रुव्ह्ड असलेल्या सेवेमध्ये आणखी क्लेम को ऑर्डीनेटर्स आणि क्लेम अप्रुव्हर्स ऍड करू शकतो. तसेच जर एखाद्या अप्रुव्हड सेवेला कोणीही क्लेम केले नसेल तर ती अप्रुव्हड सेवा रिजेक्ट सुद्धा करता येते.

॥ हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥



हरि ॐ

आपण जी काही भक्ती सेवा केली आहे त्या सेवेसाठी तुलसीपत्र मिळविण्यासाठी आपल्याला तशी रिक्वेस्ट करन्सी सिस्टीम कडे करावी लागेल.

त्या साठी डावीकडे असणार्याव रिक्वेस्ट (Request) (क्रं-5)या  बटनावर क्लिक करावे लागेल. तेव्हा त्यात तुम्हाला "करन्सी केड्रीट क्लेम" चा (Currency Credit Claim)   (क्रं- 5 A),  पर्याय मिळेल. 
करन्सी क्रेडीट क्लेम वर क्लिक केल्या नंतर खालील विंडो दिसेल. आपण ही स्क्रीन समजावून घेऊ. तुम्ही आत्ता पर्यंत एक ही करन्सी क्लेम केली नसल्याने तुम्हाला इथे "नो रेकॉर्ड फाऊंड" असा मेसेज येत आहे. त्यामुळे आपण आता आपला पहिला क्लेम सबमिट करूया. यासाठी वर्तूळात असलेल्या "अॅड न्यू क्लेम" च्या बटनावर क्लिक करा. (क्र - 5A1)

अॅड न्यू क्लेम वर क्लिक केल्यानंतर पुढील " न्यू करन्सी क्लेम"  हा पॉप अप विंडो दिसेल. 
सिस्टीम मध्ये आधीच सेवांची यादी समाविष्ट केलेली आहे. त्या पैकी तुम्ही केलेली सेवा तुम्हाला निवडायची आहे.

- त्यासाठी "सिलेक्ट सेवा वर" (क्रं- 5A2), क्लिक करावे. 
यानंतर तुम्हाला पुढील स्क्रीन दिसेल.

- आता इथे तुमची सेवा ज्या मुख्य प्रोजेक्ट अंतर्गत येते तो प्रोजेक्ट "मेन प्रोजेक्ट" या पर्यायाने निवडावा. उदा. तुम्ही ए.ए.डी.एम. हा मेन प्रोजेक्ट निवडला.
- त्या नंतर ह्या मुख्य प्रोजेक्ट मधील उप प्रोजेक्ट "सब प्रोजेक्ट" मधून निवडावा. उदा. तुम्ही क्राऊड मॅनेजमेंट  हा प्रोजेक्ट निवडला.
- आता तुम्ही जी भक्ती सेवा केलीती "भक्ती सेवा टास्क" मधून निवडावी, उदा. तुम्ही एक्स्टर्नल इव्हेंट ही सेवा निवडली. आता या सेवेसाठी तुम्ही उपासना केंद्र देखील देऊ शकता. परंतु ते देणे बंधनकारक नाही. (क्र - 5A3)
- आता त्या सेवेची तारीख देणे तुम्हाला बंधनकारक आहे. कारण त्याशिवाय ती सेवा सर्च होऊ शकत नाही.
सर्च करण्यासाठी 1 आकड्याच्या वर्तूळातील "सर्च"चे बटन दाबा.
तुम्ही भरलेली माहीती अगदी बरोबर असेल तर तुम्ही शोधत असलेली भक्ती सेवा टास्क तुम्हाला दिसेल. (क्र - 5A4)
तुमच्या भक्ती सेवा टास्कवर सिंगल क्लिक करुन 2 क्रमांकाच्या वर्तूळातील "फ़ाईल करन्सी क्लेम" या बटनावर क्लिक करावे.
त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन स्क्रिन उघडेल. 

ज्या मध्ये तुम्ही या आधी भरलेली सर्व माहिती दिसेल. आणि त्याखाली "परफॉर्मन्स मेजर" (क्रं- 5A5), हा पर्याय दिसेल. 
या परफॉर्मन्स मेजर कॉलम मध्ये तुमच्या भक्ती सेवेचे डीटेल्स भरायचे.
हे डीटेल्स अंकस्वरुपातच असतील हे लक्षात ठेवावे. 
उदा.तुम्ही १० लड्या सबमिट केल्या तर १० आकडा लिहावा तसे इथे लिहावे किंवा तुम्ही एक दिवसाची सेवा केली की १ असा आकडा भरावा. तुमच्या सेवेच्या मोजमाप चे जे प्रमाण आहे ते कंसात दिसेल. (म्हणजे Quantity, Days, Hours, etc)
त्यानंतर हा क्लेम सबमिट करताना जर काही कमेंट द्यायची असेल तर ती आपण देऊ शकतो. (क्र - 5A6) ही कमेंट अगदी थोडक्यात असावी. कमेंट देणे बंधनकारक नाही. त्यानंतर, वर्तुळातील सबमिट क्लेमच्या बटनावर क्लिक करावे. 

तुमचा क्लेम सबमीट झाल्याचा मेसेज देणारी "इन्फॉर्मेशन" नावाची विंडो तुम्हाला दिसू लागेल. 

आता क्लोज बटनावर क्लिक करुन तुम्ही पुन्हा "माय रिक्वेस्टेड क्लेम" पेज वर याल. तिथे (क्र - 5A7) टेबल मध्ये तुम्ही केलेले नवीन क्लेम दिसू लागतील.

या टेबल मधील महत्त्वाच्या गोष्टी पुढील प्रमाणे, 
भक्ती सेवा टास्क - तुम्ही ज्या कोण त्या भक्ती सेवेसाठी तुलसीपत्र मिळण्याबाबत रिक्वेस्ट केली आहे त्या भक्ती सेवेचे नाव या कॉलममध्ये दिसेल.
उपासना केंद्र  - तुम्ही ही सेवा ज्या उपासना केंद्राशी निगडीत आहे, किंवा जे उपासना केंद्र तुम्ही तुलसीपत्र रिक्वेस्ट करताना भरलेले आहे. त्या उपासना केंद्राचे नाव इथे दिसेल.
मेजरमेंट - भक्ती-सेवा किती केली गेली आहे, किती तास केली गेली आहे याची माहीती या कॉलम मध्ये दिसेल. उदा.1. जर तुम्ही 2 लड्या बनविल्या आहे. 2 No. of Hanks असा आकडा या कॉलममध्ये दिसेल.
2. जर एक दिवसाची सेवा केली आहे तर 1.0 days असे दिसेल.  
भक्ती-सेवाडेट - ज्या तारखेला तुम्ही भक्ती-सेवा केली आहे ती  तारीख या कॉलममध्ये दिसते.
रिक्वेस्ट डेट -  ज्या तारखेला तुम्ही करन्सी क्लेम करता ती तारीख इथे दिसते.
स्टेटस -  इथे तुमच्या क्लेमचा रिसेन्ट स्टेटस दिसतो.
"क्लेम स्टेटस" 
टेबलच्या वर ती उजव्या बाजूच्या कोपर्यामत "क्लेम स्टेटस" (Claim Status)  (क्रं- 5A8),   हा पर्याय  आहे. यामध्ये  तुम्हाला  सहा उप पर्याय आहेत.  ते पुढील प्रमाणे

क्लेम्ड - या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही ज्या क्लेम रिक्वेस्ट पाठविल्या आहेत त्या रिक्वेस्टस दिसतात. 
क्लेम रिजेक्टेड - तुमचा क्लेम जर रिजेक्ट झाला असेल तर या पर्यायावर क्लिक केल्यावर टेबल मध्ये दिसेल. ज्या वेळी रेकमेंडर कडून क्लेम रिजेक्ट केला जतो त्यावेळी तो क्लेम रिजेक्टेड या स्टेटस च्या इथे दिसतो. हे लेवल १ रिजेक्शन आहे.
रेकमेंडेड - तुमचा क्लेम पहिल्या लेव्हलवर कॉर्डीनेटरने म्हणजेच क्लेम रेकमेंडरने रेकमेंड केल्या नंतर या पर्यायावर क्लिक केल्यावर टेबलमध्ये दिसेल.
अप्रुव्ह्ड - तुमचा क्लेम दुसर्या लेव्हलवर सेवेसाठी असणार्या क्लेम अप्रुव्हरने अप्रुव्ह केल्या नंतर या पर्याया वर क्लिक केल्यावर टेबलमध्ये दिसेल.
रिजेक्टेड -  तुमचा क्लेम जर रिजेक्ट झाला असेल तर या पर्यायावर क्लिक केल्यावर टेबलमध्ये दिसेल. क्लेम अप्रुव्हर जेव्हा क्लेम रिजेक्ट करतो तेव्हा तो क्लेम ह्या स्टेटसला दिसतो. हे लेवल २ रिजेक्शन आहे.
कॅन्सल्ड - तुमचा क्लेम कायम स्वरुपी कॅन्सल झाला असेल तर या पर्यायावर क्लिक केल्यावर टेबलमध्ये दिसेल.
आता या क्लेम चे डिटेल्स तुम्हाला पाहायचे असल्यास त्या ओळीवर सिंगल क्लिक करा. 

त्या नंतर टेबलखाली तुम्हाला दोन बटन दिसतील. त्यातील (क्र- 5A9) "व्ह्यू सबमिट क्लेमच्या" बटन वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या क्लेमची सगळी माहीती मिळेल. 
तसेच "एडीट अॅण्ड रिसबमिट" (क्र-5A10) बटन  वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा क्लेम एडिट करता येईल. म्हणजे त्यात सुधारीत माहिती भरता येईल.
लॉगआऊट

तुमचे चण्डिका स्पिरॅच्युअल करन्सी वेबसाईट वरील काम झाल्यावर उजवीकडे असलेल्या "लॉगआऊट" (क्रं-3) च्या बटनावर क्लिक करावे.
॥ हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥

हरि ॐ
तुम्ही जर एखाद्या सेवेचे कोर्डिनेटर असाल तरच तुम्हाला क्लेम रेकमेंडेशनची ऑथोरिटी असेल.  त्या सेवेला येणार्‍या श्रद्धावानांनी सबमिट केलेल्या तुलसीपत्रांचा क्लेम रेकमेंड म्हणजेच पहिली  लेव्हल मान्य करुन अंतिम अप्रुव्हलसाठी पुढे पाठविण्याची जबाबदारी ही कॉर्डीनेटर्सवर किंवा रेकमेंडर्सवर आहे यासाठी "वर्कफ्लो" (क्र-7) मध्ये असणार्‍या  "रेकमेंड करन्सी क्लेम" (क्र-7C) वर क्लिक करावे.

त्यानंतर तुमच्या समोर करन्सी क्लेमची विंडो ओपन होते. यात असलेल्या टेबलमध्ये तुम्हाला श्रद्धावानांचे क्लेम दिसतील.   (क्र – 7C1)

या टेबलमध्ये सर्वप्रथम "सिलेक्ट"चा कॉलम आहे. येथील चेक बॉक्सवर क्लिक करुन तुम्ही एखाद्याचा क्लेम सिलेक्ट करु शकता.
त्यानंतर क्लेम करणार्यााचे नाव दुसर्‍या कॉलममध्ये दिसते.
त्यानंतरच्या कॉलममध्ये "भक्ती सेवा टास्क" दिसेल.
नंतरच्या कॉलममध्ये उपासना केंद्र दिसेल.
त्यानंतर सेवेच्या मेजरमेंट्चा कॉलम आहे. हा कॉलम तुम्हाला काळजीपूर्वक चेक करायचा आहे.
त्यानंतर भक्तीसेवेची तारीख देखील नीट पहायची आहे. 
तसेच शेवटच्या कॉलममध्ये तुम्हाला क्लेम रिक्वेस्ट तारीख दिसते.
इथे तुम्हाला व्ह्यूम डिटेल्सचे (क्र - 7C2) ऑप्शन दिसेल.ज्यामध्ये श्रद्धावान सेवेकर्यााने केलेल्या सेवेची माहिती सखोलपणे मिळेल.  


त्यानंतर तुम्हाला करन्सी रेकमेंड अथवा रिजेक्ट करता येईल. (क्र -7 C3). यासाठी एक किंवा एकापेक्षा अधिक क्लेम सिलेक्ट करुन वर्तूळातील "रेकमेंड करन्सी क्लेम"वर क्लिक करा.  तुमच्या समोर पुढील विंडो ओपन होईल. येथे तुम्ही श्रद्धावान सेवेकर्याकचा क्लेम रेकमेंड करु शकता अथवा रिजेक्ट करु शकता.
क्लेम रेकमेंडेशन्साठी (क्र-7C4) तर क्लेम रिजेक्ट करण्यासाठी (क्र- 7C5) वर क्लिक करा. क्लेम रेकमेंड  अथवा रिजेक्ट करताना तुम्ही कमेंट देखील देऊ शकता (क्र – 7C6)
क्लेम रेकमेंड केल्यानंतर तुम्हाला पुढील "इन्फॉर्मेशन" विंडो दिसेल.  त्यामध्ये क्लेम पहिल्या लेव्हल वर यशस्वीपणे रेकमेंड झाला असल्याचा मेसेज येईल.

त्यानंतर पुन्हा करन्सी क्लेमच्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला क्लेम स्टेटसमध्ये (क्र – 7C7) रेकमेंडेड असा पर्याय निवडल्यावर तुम्हाला तुम्ही रेकमेंड केलेल्या क्लेमची यादी दिसेल.

॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥

  हरि ॐ

कोर्डिनेटरने रेकमेंड केल्यानंतर श्रद्धावान युजरचा करन्सी क्लेम हा अंतिम अप्रुव्हलसाठी सेवा क्लेम अप्रुव्हर कडे येतो. सेवा क्रिएट करणारा श्रद्धावानच क्लेम रेकमेंडर  आणि  सेवा क्लेम अप्रुव्हर ची निवड करतो. सेवा क्रिएशन च्या हेल्प मॅन्युअल मध्ये या संबंधी अधिक माहिती दिलेली आहे.

तुम्हाला जर सेवा अप्रुव्हरची थॉरिटी असेल तर तुम्हाला "वर्क फ्लो" (Work Flow) (क्र - 7)मध्ये "अप्रुव्ह करन्सी क्लेम" (Approve Currency Claim) (क्र - 7D) हा पर्याय दिसेल
त्यावर क्लिक केल्यावर करन्सी क्लेमचे पेज दिसेल.
  
 ज्या सेवेचे तुम्ही क्लेम अप्रुव्हर आहात, त्या सेवेच्या क्लेम को ऑर्डीनेटरने रेकमेंड केलेल्या क्लेम्स्‌ची यादी (क्र - 7D1) दिसेल. श्रद्धावानाचा क्लेम अप्रुव्ह करण्यासाठी त्याच्या नावासमोरील चेकबॉक्स वर टीक करुन सिलेक्ट करावे. मग यादी खाली येणार्याच "अप्रुव्ह/रिजेक्ट करन्सी क्लेम" “Approve/Reject Currency Claim” (क्र - 7D2)  बटनावर क्लिक करावे.यानंतर पुढील स्क्रीन ओपन होईल.

 येथून तुम्ही क्लेम अप्रुव्ह किंवा रिजेक्ट करू शकता. अप्रुव्ह करण्यासाठी "Approve" (क्र - 7D3) या बटनावर क्लिक करा. रिजेक्ट करण्यासाठी "Reject Recommended Claim" (क्र - 7D4) या बटनावर क्लिक करा. तुम्हाला काही टिप्पणी द्यायची असल्यास वरील कमेंट बॉक्सचा वापर करता येईल. 
नंतर इन्फॉर्मेशन विंडो येईल. त्यात तुम्ही क्लेम यशस्वीपणे अप्रुव्ह केला असल्याचा मेसेज येईल. 

क्लोजवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पुन्हा करन्सी क्लेमच्या विंडोवर याल. तुम्ही सगळे क्लेम अप्रुव्ह केल्यानंतर 'रेकमेंडेड क्लेम स्टेटस' अंतर्गत तुम्हाला यादी दिसणार नाही. तुम्ही अप्रुव्ह केलेले क्लेम्स "अप्रुव्हड" या पर्यायांतर्गत दिसतील. यासाठी क्लेम स्टेटसमध्ये "अप्रुव्हड" “Approved” (क्र-7D5) हा पर्याय निवडावा.

॥ हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥

Powered by Blogger.