|| हरि ॐ ||
मदर चण्डिका
स्पिरिच्यूअल करन्सि सिस्टीममधील वार्षिक सेवांबाबत सुचना
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरूद्ध बापूंच्या
मार्गदर्शनाप्रमाणे मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सि गेल्यावर्षापासून सुरु केली गेली व त्यानुसार विविध सेवा करुन तुळशीपत्र मिळवून अनेक श्रद्धावान त्याचा लाभ घेतच आहेत. या सिस्टीममधे
उपासना केंद्रांनी काही वार्षिक सेवा क्रिएटही केल्या आहेत, उदाहरणार्थ रामनाम वही,
अंजनामाता वही. अशा वार्षिक सेवांचा कालावधी १२
जुलै २०१४ (गुरूपौर्णिमा) ते २८ मार्च २०१५ (रामनवमी) असा होता. सर्व उपासना केंद्रांना या सुचनेद्वारे
कळवण्यात येत आहे की, चण्डिका स्पिरिच्युअल करन्सी सिस्टीम मधे पुढील वर्षासाठी सर्व वार्षिक सेवांकरता २९ मार्च २०१५ ते ३१ मार्च २०१६ हा सेवा-कालावधी
(Seva Period) ठरवण्यात आलेला आहे व केंद्रांनी त्याप्रमाणे पुढील वर्षाच्या
वार्षिक सेवा क्रिएट कराव्यात..
तसेच त्यानंतर अशा सर्व वार्षिक सेवांकरता १ एप्रिल <वर्ष>
ते ३१ मार्च <पुढील वर्ष> असा सेवा-कालावधी (Seva Period) राहील.
उदाहरणार्थ, १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७..... त्यानंतर
१ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८. पण दरवर्षी एका वर्षासाठीच सेवा क्रिएट करता येईल याची कृपया सर्वांनी नोंद
घ्यावी.
ह्या बाबात आपली अजुन काही शंका किंवा माहिती पाहिजे असल्यास आपण ह्या सिस्टीमच्या
"हेल्पलाईन" मधिल श्रद्धावानांशी अथवा आपल्या केंद्रीय केंद्र संपर्क समितीशी
संपर्क साधावा.
सुनिलसिंह मंत्री
मुख्य कार्यकारी अधिकारी
0 comments:
Post a Comment