Sunday, 12 October 2014

हरीॐ
चण्डिका स्पिरिच्युअल करन्सीमध्ये आपले स्वागत आहे.


सर्व प्रथम आपल्या ब्राऊजरच्या ऍड्रेसबार मध्ये चण्डिका स्पिरॅच्युअल करन्सीची www.chandikaspiritualcurrency.com युआरएल (साईटचा पत्ता) टाईप करावी. तुमच्या समोर पुढील होम पेज दिसेल. रजिस्टर करण्यासाठी जॉईनच्या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल.

हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर  आपण ज्या ई-मेलने रजिस्टर केले आहे; त्या ई-मेलवर तुम्हाला चण्डिका स्पिरिच्युअल करन्सी कडून मेल येईल.  त्यात तुमचा पासवर्ड असेल.  ह्या पासवर्डचा वापर करुन तुम्ही चण्डिका करन्सीला लॉगइन करू शकता. पहिल्यांदा लॉगइन केल्यावर तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकता.  
चण्डिका करन्सी सिस्टीमचा लाभ घेण्यासाठी हा रजिस्ट्रेशनफॉर्म भरणे अनिवार्य आहे. 
लॉगइन

आता होमपेज साठी लॉगइन च्या बटनवर क्लिक करा. एक नवी पॉपअप विंडो उघडेल. त्यात 1 आकडा लिहला आहे तिथे तुमचा ईमेल व 2 आकडा लिहला आहे तिथे तुमचा पासवर्ड भरावा आणि मग बाण दाखविलेल्या लॉगइनच्या बटनावर क्लिक करावे.
लॉगइन केल्यावर खालील स्क्रीन तुम्हाला दिसते. या स्क्रिनवर उजवीकडे मायप्रोफाईल (क्रं-१), चेंजपासवर्ड (क्रं- २), लॉगआऊट (क्रं- ३) आणि हेल्पचे (क्रं- ४) बटन आहे.

तुमची स्वतःची प्रोफाईल पाहण्यासाठी माय प्रोफाईलवर  (क्रं-१),  क्लिक करावे. इथे तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये भरलेली माहिती पाहता येईल. इथून तुम्हाला तुमची माहिती एडिटही करता येईल. त्यासाठी एडिट प्रोफ़ाईलच्या बटनावर क्लिक करावे. इतर माहिती सोबत आता आपण आपला इमेल आयडी देखील बदलू शकतो.

चेंज पासर्वड
चण्डिका करन्सीने दिलेला पासवर्ड बदलण्यासाठी "चेंजपासर्वड" (क्रं- २) वर क्लिक करा. 
(टीप: तुमच्या अकाऊंटच्या सुरक्षितेसाठी तुमचा अकाऊंट पासवर्ड हा कुणाशीही शेअर करु नये. (क्र - ५ (रिक्वेस्ट), ६ (करन्सी व्ह्यू), व ७ (वर्कफ्लो) बद्द्लची माहीती पुढे वेगळी देण्यात आलेली आहे.)

फ़रगॉट पासवर्ड
जर तुम्ही तुमचा चंडिका करन्सी अकाउंटचा पासवर्ड विसरला असाल तर लॉगइन बटनवर क्लिक करून फ़रगॉट पासवर्ड ऑपशन वर क्लिक करावे. 

आपला इमेल आयडी टाईप करून डेट ऑफ़ बर्थ लिहिलेल्या कॉलममध्ये आपली जन्म तारिख टाईप करावी. सबमीट ऑपशन क्लिक करावे. 

आपल्या इमेल आयडीच्या इनबॉक्स मध्ये लगेचच आपला नवीन पासवर्ड पाठवला जातो. तो वापरून  तुम्ही अकाउंटला लॉगइन करू शकता. 

हेल्प मेन्यु
जर तुम्हाला चंडिका करन्सी बद्दल कुठलीही अडचण असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही हेल्प मेन्यु क्लिक करून अधिक माहिती मिळवू शकता. 

चण्डिका स्पिरिच्युअल करन्सीमध्ये आपल्याला जी करन्सी मिळणार आहे त्याचे डिनॊमिनेशन्स देखील हेल्प मेन्यु मध्ये तुम्ही पाहू शकता. 
चण्डिका स्पिरिच्युअल करन्सी मधील नवीन नोटिफ़िकेशन्स पाहण्यासाठी हेल्प मेन्यु मध्ये जावे.
लॉगआऊट
चंडिका करन्सी अकाउंटवर आपले सर्व काम पूर्ण झाल्यावर कृपया लॉगआऊट बटन क्लिक करून एक्झिट करणे.
॥हरिॐ॥॥श्रीराम॥॥अंबज्ञ॥

Powered by Blogger.