Friday, 25 July 2014

हरि ॐ

परम पूज्य बापूंनी सांगितल्याप्रमाणे या सिस्टीममध्ये असणार्‍या  कोणत्याही श्रद्धावानाची एकूण करन्सी आपण पाहू शकतो. यासाठी "करन्सी व्ह्यू " (Currency View) (क्र – 6) मधील "अदर श्रद्धावान करन्सी अकाऊंट" (Other Shraddhavan Currency Account) (क्र - 6B) वर क्लिक करा. तुम्हाला पुढील विंडो दिसेल. 

यामध्ये (क्र-6B1) उपासना केंद्र, युजर टाईप, पहिले नाव, आडनाव, ई-मेल ह्या पर्यायाच्या सहाय्याने आपण श्रद्धावानाचे अकाऊंट शोधू शकतो. यासाठी तुम्ही डिटेल्स भरुन सर्चच्या बटनवर क्लिक करा. (क्र -6B2).

त्यानंतर तुम्हाला वरील विंडो दिसेल. आता आपण निखिल भालवणकर यांच्या नावाला सर्च दिला.आताखाली तुम्हाला या नावाची लिस्ट दिसेल. (क्र - 6B3) समान नावाची अनेक श्रद्धावान असतील तर त्या सगळ्यांची नावे तुम्हाला यादीत दिसतील.  तुम्हाला हवे असलेल्या श्रद्धवानाचे नाव सिलेक्ट करुन व्ह्यू अकाऊंट डिटेल्स "View Account Details" वर क्लिक करा (क्र – 6B4) 
तुम्हाला पुढची विंडो दिसेल.

येथे तुम्हाला त्या श्रद्धावानाची एकूण तुलसीपत्रे, त्याची अकाऊंट ओपनिंग डेट, याची माहिती मिळेल. आता क्लोजवर क्लिक करुन तुम्ही पुन्हा मागच्या विंडो वर याल.
याच श्रद्धावानाला तुम्हाला तुलसीपत्रे ट्रान्सफर करावयाची असल्यास "ट्रान्सफर माय करन्सी" (Transfer My Currency) (क्र - 6B5) अकाऊंटवर क्लिक करावे.आता पुढची विंडो उघडेल. 

तुम्ही तुमच्या आप्तांना शुभप्रसंगी स्पिरिच्यूअल करन्सी भेटवस्तू म्हणून देऊ शकता. 

तुम्हाला जितकी करन्सी द्यावयाची आहे तो आकडा अमाऊंट (Amount) (क्र-6B6) मध्ये भरा. ट्रान्सफर करताना तुम्हाला काही टिप्पणी द्यावयाची असेल तर (क्र – 6B7) च्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. शेवटी "ट्रान्सफर" (Transfer) (क्र – 6B8) हे बटन क्लिक करा. 

तुमची करन्सी म्हणजेच तुलसीपत्रे यशस्वीपणे ट्रान्सफर झाल्यावर तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन (Information)  विंडो दिसेल. त्यामध्ये तुमची करन्सी अमाऊंट ही यशस्वीरित्या ट्रान्सफर झाली असा मेसेज असेल. 
॥ हरि ॐ ॥  ॥ श्री राम ॥  ॥ अंबज्ञ ॥

Powered by Blogger.